
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेतील उत्तरादरम्यान ही घोषणा केली. या विलीनीकरणामुळे कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणी दूर होतील, तसेच रेल्वेच्या विकासाला गती मिळेल. मात्र, कोकण रेल्वेचे नाव तसेच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.