Maharashtra Revenue : महाराष्ट्र सर्वाधिक महसूल देणारे राज्य ; दस्तनोंदणीतून ५० हजार कोटींचे उत्पन्न; २७ लाखांहून अधिक व्यवहार

राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. दस्तनोंदणीतून यंदा प्रथमच ५० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे.
Maharashtra Revenue
Maharashtra Revenue sakal

पुणे : राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. दस्तनोंदणीतून यंदा प्रथमच ५० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यामुळे महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक उत्पन्न मिळणारे राज्य ठरले आहे. आर्थिक वर्षात २८ लाख २६ हजार १५० दस्तांची नोंदणी होऊन ५० हजार ५०० कोटींचा महसूल मिळाला.

आर्थिक वर्षात ४५ हजार कोटी आणि त्यानंतर वाढीव ५० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट राज्य सरकारने विभागाला दिले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला यश आले. गुजरात आणि उत्तर प्रदेशला दस्तनोंदणीतून सुमारे २५ ते ३० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या उलट महाराष्ट्राला आतापर्यंत ४४ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

Maharashtra Revenue
Loksabha Election 2024 : नाराजांचा प्रवाहो निघाला ‘मातोश्री’कडे!

यंदा प्रथमच ५० हजार कोटींचा टप्पा पार करून नोंदणी विभागाने स्वत:च्या नावावर विक्रमी महसूल मिळविला. गतवर्षी (२०२२-२३) ४४ हजार ६८१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यामध्ये पाच हजार ८१९ कोटींची वाढ होऊन २०२३-२४ आर्थिक वर्षात ५० हजार ५०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले. तर दस्त संख्येत गतवर्षीपेक्षा यावर्षी दोन लाख १३ हजार ६५५ ने वाढ झाली आहे. वस्तू व सेवा करानंतर राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देण्यात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा क्रमांक लागतो.

पुण्यातून २२.५० टक्के उत्पन्न

नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (२०२३-२४) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून दस्तनोंदणीतून नऊ हजार १३० कोटींचे; तर ग्रामीण भागातून सुमारे दोन हजार १८७ कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे पुणे शहर व ग्रामीण भागातून मिळून एकूण ११ हजार ३१७ कोटींचा महसूल जमा झाला. यावरून राज्याला दस्तनोंदणीतून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी सुमारे २२.५० टक्के उत्पन्न एकट्या पुणे शहर व जिल्ह्यातून मिळाले आहे. मुंबई आणि मुंबई उपनगर यापेक्षाही अधिक महसूल पुणे शहर व ग्रामीण भागातून मिळाला आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी शासनाने ५० हजार कोटींचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा पाचशे कोटींचा जास्त महसूल जमा झाला. रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ न करता महसूल मिळाला आहे.

- हिरालाल सोनवणे, नोंदणी महानिरीक्षक

चालू आर्थिक वर्षाचा आढावा

महिना दस्त संख्या महसूल (कोटीत)

एप्रिल २,२४,६७३ २,८७५.८०

मे २,२०,७३५ ३,४३९.६२

जून २,५१,६९९ ३,८०४.६९

जुलै २,२९,११७ ३,९२१.६३

ऑगस्ट २,३७,४६९ ४,०५६.४६

सप्टेंबर २,१०,२५६ ४,३७६.९६

ऑक्टोबर २,२६,०५६ ३,७९७.६१

नोव्हेंबर २,१२,१८९ ३,७३१.७८

डिसेंबर २,१०,००२ ३,९८२.२२

जानेवारी २,४७,९१२ ४,१५६.४७

फेब्रुवारी २,६७,५३० ४,४३५.९०

मार्च १,९१,६२६ ७,९२१

एकूण २८,२६,१५० ५०,५००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com