Success Story of Jay Chaudhari : कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कठीण आव्हानांचाही सामना करता येऊ शकतो हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं आपण आजवर बघितली असून यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. जय चौधरी असं व्यक्तीचं नाव आहे. घरी अठरा विश्व दारिद्र असताना आपल्या कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. याच जय चौधरी यांची ही यशोगाथा.