Marginal Relief in Income Tax : मार्जिनल रिलीफ आणि करदायित्व
Tax Saving Tips : कर सवलतीच्या मर्यादेपेक्षा थोडेसे उत्पन्न जास्त झाल्यासही मोठा कर भरावा लागत होता. आता सीमांत सवलतीमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नव्या करप्रणालीअंतर्गत एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न सात लाख रुपये व जुन्या करप्रणाली अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक झाले, तर कलम ८७अ अंतर्गत उपलब्ध असलेली २५ हजार रुपये व १२,५०० रुपयांची कमाल करसवलत मिळत नाही.