Maruti Suzuki : मारुती सुझुकी 2031 पर्यंत दरवर्षी बनवणार 40 लाख कार, विक्री दुप्पट करण्याचे टारगेट...

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) 2031 पर्यंत वर्षाला 40 लाख कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे कंपनीच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे.चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीचे चीफ इनव्हेस्टर रिलेशन ऑफिसर राहुल भारती यांनी ही माहिती दिली.
Maruti Suzuki
Maruti SuzukiSakal

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) 2031 पर्यंत वर्षाला 40 लाख कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे कंपनीच्या सध्याच्या उत्पादनापेक्षा दुप्पट आहे.चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीचे चीफ इनव्हेस्टर रिलेशन ऑफिसर राहुल भारती यांनी ही माहिती दिली.

कंपनी आपल्या वाढीच्या तिसऱ्या टप्प्यात मोठे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे. दरम्यान मारुती सुझुकीचा शेअर बीएसईवर सध्या 12687.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. मारुती सुझुकी याला त्यांच्या उत्क्रांतीचा तिसरा टप्पा म्हणत आहे आणि त्याला मारुती सुझुकी 3.0 असे नाव दिले आहे. कंपनी या टप्प्यात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर देणार आहे.

पहिल्या टप्प्यात, मारुतीचे लक्ष लोकल कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार करण्यावर आणि देशभरात नेटवर्क विस्तारण्यावर होते. तर दुसऱ्या टप्प्यात कंपनीचे अग्रगण्य स्थान मजबूत करण्यावर भर देण्यात आला होता.

प्रवासी आणि लाइट कमर्शियल व्हेईकल्ससह एकूण उत्पादनाचे प्रमाण मार्च 2024 मध्ये 1.66 लाख युनिट होते, जे मागील वर्षीच्या कालावधीत 1.54 लाख युनिट होते. दरवर्षी 40 लाख वाहनांचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कंपनीने हरियाणातील कारकोडा इथे ग्रीनफिल्ड प्रोजेक्टचे बांधकाम सुरू केले आहे.

2.5 लाख युनिट्सची वार्षिक उत्पादन क्षमता असलेला पहिला प्लांट 2025 मध्ये सुरू होणार असल्याचे राहुल भारती म्हणाले. अलीकडेच व्हायब्रंट गुजरात समिट 2024 मध्ये, मारुती सुझुकीने गुजरात सरकारसोबत नवीन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, ग्रीनफिल्ड फॅसिलिटी स्थापन करण्यासाठी करार केला आहे. वार्षिक उत्पादन क्षमता अंदाजे 35,000 कोटीच्या एकूण गुंतवणूकीसह 1 दशलक्ष युनिट्स असणे अपेक्षित आहे.

आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत मारुती सुझुकीचा नेट प्रॉफिट वार्षिक 48 टक्क्यांनी वाढून 3,878 कोटी झाला आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या तीन महिन्यांत 38,235 कोटीची कमाई झाली. याव्यतिरिक्त, कंपनीने प्रति शेअर 125 रुपये हा आतापर्यंतचा सर्वोच्च डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com