इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtra: मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले होते. दरम्यान या कंपनीला राज्यातील मुंबई महानगर आणि प्रदेशातील अनेक कंत्राटे मिळाली आहेत.
NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtra
NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtrasakal

NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtra

सोशल मीडियापासून सर्वत्र केवळ निवडणूक रोख्यांचीच चर्चा झाली. निवडणूक आयोगाने अधिकृत डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आणि सार्वजनिक केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा संपूर्ण डेटा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिला. या यादीमध्ये अशा कंपन्यांची नावे आहेत ज्यांनी राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी निवडणूक रोखे खरेदी केले होते.

या यादीत पहिल्या दोन कंपन्यांचा समावेश आहे पहीली लॉटरी कंपनी फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसेस आणि दुसरी मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) आहे. दरम्यान मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेतले होते. दरम्यान या कंपनीला राज्यातील मुंबई महानगर आणि प्रदेशातील अनेक कंत्राटे मिळाली आहेत. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मंगळवारी विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्ता आणि पुणे रिंगरोडसह विविध प्रकल्पांच्या निविदा उघडल्या. यामध्ये मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ४ करार जिंकले आहेत. 

NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtra
Pune Porsche Crash : बाल सुधारगृहात कसा असतो दिनक्रम? विशाल अग्रवालच्या आरोपी मुलाची १४ दिवस झाली रवानगी

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा एकचे कंत्राट देखील याच कंपनीला मिळाले होते. दरम्यान एमएमआरडीएच्या ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम देखील या कंपनीला देण्यात आले. कंपनीने पुणे रिंगरोडच्या 5 टप्प्यांसाठी 5 निविदा आणि विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या 3 टप्प्यासाठी 3 निविदा सादर केल्या होत्या. 

एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेघा इंजिनिअरिंगला पुणे रस्ता प्रकल्पाच्या पहिल्या, पाच आणि सात टप्प्यासाठी कंत्राट मिळाले आहे. तर विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या कामासाठी तीन निविदा सादर करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंगला केवळ एका टप्प्याचे काम मिळाले आहे. 

NFRASTRUCTURE LIMITED-Important contracts in Maharashtra
अन्न आणि पोषण आहार मंडळ विसर्जित; सुसूत्रीकरणाच्या मोहिमेला वेग; मालमत्तांची विक्री शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com