

Meesho IPO Allotment
esakal
Meesho Offers : ई-कॉमर्सच्या आकाशात वेगाने झेप घेणाऱ्या मीशो कंपनीने गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी दिली आहे. भारतातील सर्वात मोठ्या व्हॅल्यू-फर्स्ट प्लॅटफॉर्म मीशोचे IPO शेअर्स बुधवारी १० डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर लिस्ट होणार आहेत. लिस्टिंगपूर्वीच ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) मध्ये ४२ रुपयेची जबरदस्त वाढ झाली असून शेअरची अपेक्षित किंमत १५३ रुपयेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे IPO किंमती १११ रुपयेच्या तुलनेत ३८% पेक्षा जास्त प्रीमियम असेल त्यामुळ ही संधी सोडू नका, कारण तुम्हीही मीशोचे पार्टनर होऊन लाखो रुपयांची कमाई करू शकता.