
Narayan Murthy New Home : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये 50 कोटी रुपये किमतीचे आलिशान घर खरेदी केले आहे. ही सदनिका 16व्या मजल्यावर असून 8,400 चौरस फूट क्षेत्रफळामध्ये पसरलेली आहे. यामध्ये चार भव्य बेडरूम, पाच कार पार्किंग आणि आलिशान सुविधांनी भरलेले आहे. या खरेदीने नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.प्रेस्टीज ग्रुप आणि मल्ल्या यांची कंपनी यांच्यातील जेव्हीनंतर हा टॉवर बांधण्यात आला होता.
किंगफिशर टॉवर्स, बेंगळुरूतील सर्वात प्रतिष्ठित प्रकल्पांपैकी एक आहे. 34 मजल्यांचा हा टॉवर 4.5 एकर परिसरात पसरलेला असून यामध्ये एकूण 81 लक्झरी अपार्टमेंट्स आहेत. हा टॉवर विजय मल्ल्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर उभारला गेला आहे. 2010 साली प्रेस्टीज ग्रुप आणि मल्ल्यांच्या कंपनीने संयुक्त उपक्रमांतर्गत या प्रकल्पाचे काम सुरू केले. त्यावेळी अपार्टमेंटचा दर 22,000 रुपये प्रति चौरस फूट होता, जो आता 59,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
चार वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांनी याच टॉवरच्या 23व्या मजल्यावर 29 कोटी रुपयांना एक अपार्टमेंट खरेदी केले होते. आता दुसऱ्या आलिशान सदनिकेच्या खरेदीमुळे त्यांनी किंगफिशर टॉवर्समध्ये आपली उपस्थिती मजबूत केली आहे.
किंगफिशर टॉवर्समध्ये नारायण मूर्ती यांच्यासह बायोकॉनच्या किरण मुझुमदार-शॉ यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे अपार्टमेंट्स आहेत. 2022 मध्ये कर्नाटकचे मंत्री केजे जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज यांनीही येथे घर खरेदी केले होती.
किंगफिशर टॉवर्समधील आलिशान जीवनशैलीसाठी रहिवाशांना दर तिमाहीत सुमारे 5 लाख रुपये देखभाल शुल्क भरावे लागते. उच्चभ्रू वर्गासाठी खास तयार करण्यात आलेला हा टॉवर आधुनिक सुखसोयींच्या बाबतीत अनन्यसाधारण आहे.
किंगफिशर टॉवर्सचा इतिहास आणि त्याची भव्यता यामुळे तो बेंगळुरूतील प्रमुख आकर्षण ठरला आहे. नारायण मूर्तींच्या या नवीन खरेदीमुळे आयटी उद्योगातील मोठ्या व्यक्तींच्या लक्झरी जीवनशैलीची झलक पाहायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.