
भारतीय संस्कृती आणि चहाचा सुगंध जगभर पसरवणाऱ्या अखिल पटेल या भारतीय वंशाच्या उद्योजकाने नुकतीच एक अनोखी कामगिरी केली आहे. लंडनमधील अमाला चाय या आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना कडक मसाला चाय पाजली. हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता, याबाबत त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.