Work From Home : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No work from home for government employees Jitendra Singh tells Lok Sabha

Work From Home : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम बंद

Work From Home : केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले की, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले आहे.

निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची परवानगी देणे शक्य नाही आणि कर्मचार्‍यांना कार्यालयात येणे आवश्यक आहे. (No work from home for government employees Jitendra Singh tells Lok Sabha)

लोकसभेत भाजप खासदार रंजनबेन धनंजय भट्ट आणि राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास दादासाहेब पाटील यांच्या प्रश्नाला राज्यमंत्री उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच आता घरून काम करण्याचा नियम सर्वसाधारणपणे लागू होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

सरकारने कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराची अंमलबजावणी करण्यासाठी COVID-19 च्या काळात मध्यम/कनिष्ठ कर्मचाऱ्यांना अपवाद म्हणून घरून काम करण्याची परवानगी दिली होती.

जितेंद्र सिंह म्हणाले, "साथीच्या रोगावरील निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याने, कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे."

कोरोनाच्या केसेसमध्ये लक्षणीय घट होत आहे. भारतात 100 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांसह अनेक कंपन्या पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू होत आहेत.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्यास ऑफिसला बोलावलं जात आहे. आता घरून काम करण्याची संस्कृतीही हळूहळू कमी होत आहे. एक वर्षापेक्षा जास्त काळ घरातून काम केल्यानंतर, अनेक आयटी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमधून काम करण्यास सांगितले आहे.