

NPS Rules Updated: How Bank-Run Pension Funds Will Impact Your Retirement
esakal
Pension Scheme Changes : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) संदर्भात दोन मोठे बदल जाहीर केले आहेत. एनपीएस अधिक फायदेशीर आणि सक्षम करण्यासाठी PFRDA ने हा निर्णय घेतला आहे. यानुसार आता एनपीएसवरील शुल्क कमी होणार असून, त्यासोबतच बँकांनाही स्वतंत्र पेन्शन फंड स्थापन करून निधी व्यवस्थापनाची संधी मिळणार आहे.