
मुंबई : देशातील एकूण डी-मॅट खात्यांची संख्या ऑक्टोबर २०२४ अखेर १८ कोटींजवळ पोहोचली आहे. मात्र, नव्या खात्यांच्या संख्येत ऑक्टोबरमध्ये घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ३५ लाख नवी खाती जोडली गेली असून, सरासरी मासिक ३९ लाख खात्यांच्या तुलनेत त्यात घट झाली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.