घरगुती बचतीत मोठी घट; तीन वर्षांत नऊ लाख कोटी रुपयांनी घटून १४.१६ लाख कोटींवर

देशातील निव्वळ घरगुती बचत गेल्या तीन वर्षांत नऊ लाख कोटी रुपयांनी घटली असून, ती आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेर १४.१६ लाख कोटी रुपयांवर आली आहे
household savings
household savingsSakal

नवी दिल्ली : देशातील निव्वळ घरगुती बचत गेल्या तीन वर्षांत नऊ लाख कोटी रुपयांनी घटली असून, ती आर्थिक वर्ष २०२२-२३ अखेर १४.१६ लाख कोटी रुपयांवर आली आहे, अशी माहिती सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या राष्ट्रीय खाते सांख्यिकी २०२४ अहवालात दिली आहे. या अहवालानुसार, वर्ष २०२०-२१ मध्ये घरगुती बचत २३.२९ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती.

वर्ष २०२१-२२ मध्ये मात्र, ती १७.१२ लाख कोटींपर्यत कमी झाली आणि वर्ष २०२२-२३ मध्ये १४.१६ लाख कोटी रुपयांच्या पाच वर्षातील नीचांकावर पोहोचली होती. सर्वांत कमी बचत २०१७-१८ मध्ये १३.०५ लाख कोटी रुपये होती. ती २०१८-१९ मध्ये १४.९१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली, तर २०१९-२० मध्ये १५.४९ लाख कोटींवर गेली.

या अहवालानुसार, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वर्ष २०२२-२३ मध्ये १.७९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली असून, वर्ष २०२०-२१ मधील ६४,०८४ लाख कोटींवरून ती तिपटीने वाढली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १.६ लाख कोटी रुपये होती.

या तीन वर्षांच्या कालावधीत कर्ज घेण्याचे प्रमाणही दुपटीने वाढल्याचे आढळून आले असून, वर्ष २०२२-२३ अखेर ११.८८ लाख कोटी रुपयांची कर्जे घेतली गेली आहेत. वर्ष २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ६.०५ लाख कोटी रुपये होते, तर २०२१-२२ मध्ये ते ७.६९ लाख कोटी रुपये होते.

बिगरबँकिंग वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही तीन वर्षांत चौपटीने वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये ३.३३ लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले गेले. वर्ष २०२०-२१ मध्ये ते ९३,७२३ कोटी होते, तर वर्ष २०२१-२२ मध्ये १.९२ लाख कोटी रुपये होते.

ठळक मुद्दे

  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक १.७९ लाख कोटी रुपये

  • शेअर आणि रोख्यांमधील गुंतवणूक २.०६ लाख कोटी रुपये

  • कर्ज घेण्याच्या प्रमाणातही दुपटीने वाढ

  • बिगरबँकिंग वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचे प्रमाणही चौपट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com