
2023-24 मध्ये, भारतीय जनता पक्षाला (भाजप) व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट घराण्यांकडून 20,000 रु. व त्यावरील देणग्यांद्वारे सुमारे रु. 2,244 कोटी मिळाले. 2022-23 च्या तुलनेत या देणग्यांमध्ये तीन पट वाढ झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस पक्षाला याच मार्गाने रु. 288.9 कोटींच्या देणग्या मिळाल्या, ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.