Polycab India : पॉलीकॅब इंडियाचे शेअर्स मार्च तिमाहीच्या निकालानंतर रॉकेट ; 300% डिविडेंडची घोषणा

Share Market : कंपनीचा कंसालिडेटेड नेट प्रॉफिट मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर 29 टक्क्यांनी वाढून 553 कोटीवर
पॉलीकॅबच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला.
पॉलीकॅबच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला.esakal

Polycab India Shares : पॉलीकॅब इंडियासाठी (Polycab India) मार्च तिमाही अपेक्षेपेक्षा खूपच चांगली राहिली. मार्च तिमाही निकालांसोबतच, कंपनीने शेअरहोल्डर्सना 300 टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा कंसालिडेटेड नेट प्रॉफिट मार्च तिमाहीत वार्षिक आधारावर 29 टक्क्यांनी वाढून 553 कोटीवर पोहोचला. या कालावधीत परिचालन महसूलही 29 टक्क्यांनी वाढून 5,592 कोटीवर पोहोचला. या उत्कृष्ट निकालावर पॉलीकॅबच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला.

पॉलीकॅबच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला.
Share Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्समध्ये 230 अंकांची वाढ, कोणते शेअर्स चमकले?

मार्च 2024 च्या तिमाहीत, पॉलीकॅब इंडियाचा कंसालिडेटेड नेट प्रॉफिट वार्षिक 29 टक्क्यांनी वाढून 553 कोटीवर पोहोचला आणि ऑपरेशनल महसूलही त्याच वेगाने 5592 कोटीवर गेला. या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 10 टक्क्यांनी वाढून 762 कोटीवर पोहोचला. पण, ऑपरेटिंग मार्जिन 0.30 टक्क्यांनी घसरून 13.6 टक्क्यांवर आले. कंपनीचे चेअरमन आणि एमडी इंदर टी जयसिंघानी यांनी कंपनीच्या सुधारित निकालाचे श्रेय डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क, मॅन्युफॅक्चरिंग कॅपिबिलिटीज तसेच ऑपरेशनल आणि ऑर्गेनायझेशनल एक्सलंसवर वाढलेले लक्ष यांना दिले.

पॉलीकॅब इंडियाने प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश जाहीर केला आहे. शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये असल्याने, लाभांश पेआउट 300 टक्के आहे. आता रेकॉर्ड डेटबाबत बोलायचे झाले तर ती अजून निश्चित झाली नसून लवकरच निर्णय घेतला जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) शेअरहोल्डर्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर, बैठकीच्या 30 दिवसांच्या आत शेअरहोल्डर्सच्या अकाउंटमध्ये जमा केले जाईल असे एक्सचेंज फायलिंगमध्ये कंपनीने सांगितले.

पॉलीकॅबच्या शेअर्सने विक्रमी उच्चांक गाठला.
Vijaya Diagnostic : विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी, टारगेट प्राइसमध्ये वाढ

कमकुवत सुरुवातीनंतर, जेव्हा पॉलीकॅबचे निकाल आले, तेव्हा शेअर्स अचानक रॉकेट वेगाने वाढले. शुक्रवारी बीएसईवर तो 6.52 टक्क्यांच्या वाढीसह 6180.00 रुपयांवर बंद झाला. तो दिवसभरात 5765.95 रुपयांपर्यंत घसरला होता, पण पुन्हा सावरला आणि 6364.00 रुपयांची विक्रमी उच्चांकावर गेला. गेल्या वर्षी, 11 मे 2023 रोजी, तो 3,200.05 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com