Paytm RBI Ban: वॉलेट, फास्ट टॅग्स पोर्ट होतील? आता UPI पेंमेंट करता येणार का? जाणून घ्या सर्व प्रश्नाची उत्तरं

Paytm Payments Bank RBI ban : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेड (Paytm Payments Bank Limited) ला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी घातली आहे.
Paytm Payments Bank RBI ban
Paytm Payments Bank RBI ban

Paytm Payments Bank RBI ban : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम (Paytm) पेमेंट बँक लिमिटेड (Paytm Payments Bank Limited) ला ग्राहकांच्या खात्यासंबंधी व्यवहारावर बंदी घातली आहे. यानिर्णयानंतर पेटीएमला मोठा फटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की पेटीएम पेमेंट बँकेला २९ फेब्रुवारीपासून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत. यामुळे पेटीएम वापरकर्त्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज आपण अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पेटीएम वॉलेट दुसऱ्या यूपीआयमध्ये पोर्ट करता येईल?

हा प्रश्न अनेक वापरकर्त्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. तुमच्याकडे पेटीएम वॉलेट असेल तर ते पोर्ट करम्याचा कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये.

पेटीएम वॉलेट किंवा पेमेंट्स बँक खात्यात पैसे टाकले जाऊ शकतात ?

सध्या, आपण हे करू शकतो पण लवकरच हे बंद होणार आहे. २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकांची खाती, वॉलेट, प्रीपेड उपकरणे, FASTags, NCMC कार्ड टॉप अप्स, क्रेडिट ट्रान्सीक्शन्स इत्यादींना परवानगी दिली जाणार नाहीये. पेटीएम वॉलेट आणि पेमेंट्स बँक खात्यात पैसे टाकणे शक्य होणार नाहीये.

Paytm Payments Bank RBI ban
आरबीआयची मोठी कारवाई; Paytm पेमेंट बँकेतील सर्व व्यवहारांवर 29 फेब्रुवारीपासून बंदी

पेटीएम पेमेंट बँकसाठी बँकिंग सर्व्हिसेस उपलब्ध असणार का?

आरबीआयने स्पष्ट सांगितलं आहे की, २९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेटीएम पेमेंट्स बँकेला ग्राहकांना कुठल्याही बँकिंग सर्व्हिसेस देता येणार नाहीयेत.

पेटीएम अॅप वापरून यूपीआय पेमेंट्स होणार का?

अनेक वापरकर्त्यांना प्रश्न पडला आहे की, आता पेटीएम अॅप वापरून आता कोणत्याही अडचणींशिवाय यूपीआय पेमेंट करता येणार का? तर वापरकर्ते पेटीएम अॅपने यूपीआय पेमेंट्स करू शकणार आहेत. तुम्ही त्याचा वापर सुरू ठेवू शकणार आहेत. फक्त पेटीएम पेमेंट्स बँक ट्राजिक्शन्सवरती बंदी असणार आहे.

Paytm Payments Bank RBI ban
Rajya Sabha Election : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? २७ फेब्रुवारी रोजी आहे मतदान

पेटीएम वॉलेट किंवा पेमेंट्स बँक खात्यांमधून रक्कम काढणे शक्य आहे का?

तर होय, पेटीएम वॉलेट आणि पेमेंट्स बँक खात्यांमधून शिल्लक रक्कम काढण्याची किंवा ते वापरण्याची परवानगी २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत असणार आहे. या तारखेनंतर, युजर्स फक्त त्यांच्या वॉलेट किंवा खात्यातून पैसे काढू किंवा ट्रान्सफर करू शकतात.

बँकेने जारी केलेले FASTags, ट्रान्झिट कार्डचे काय होणार?

यामधील बॅलेन्स, काढले किंवा हस्तांतरित केली जाऊ शकते. मात्र, या खात्यांमध्ये अतिरिक्त टॉप-अप्स किंवा क्रेडिट्ससाठी फक्त २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच परवानगी असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com