Saving Account मध्ये पैसे ठेवणाऱ्यांना होणार फायदा, या बँका देत आहेत जास्त व्याज

बचत खाते म्हणजे काय?
Saving Account Benefits
Saving Account Benefits esakal

Saving Account Benefits : भारतातील बहुतांश लोकांचे बँकेत बचत खाते आहे. बँकेने त्या रकमेवर कितीही व्याज दर दिला तरी बहुतांश लोक आपले पैसे बचत खात्यात ठेवतात. नफा कमावण्यासाठी लोक आपला पैसा शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवतात.

बचत खात्यावरील व्याजदराची गणना दैनंदिन क्लोजिंग बॅलन्सच्या आधारे केली जाते. बचत खात्याचे व्याज दर महिन्याला किंवा तिमाहीतून एकदा खातेदाराच्या खात्यात जमा केले जाते. हे व्याज किती असेल हे तुमच्या बचत खात्यात ठेवलेल्या रकमेवर अवलंबून असेल.

आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगणार आहोत जे ग्राहकांना बचत खात्यावर जास्त व्याज दर देत आहेत.

Saving Account Benefits
Flipkart Big Saving Days Sale : आता फ्लिपकार्टवर मिळणार स्मार्टफोन, टीव्हीवर दमदार डिस्काउंट

बचत खाते म्हणजे काय?

सेविंग अकाउंटला मराठीमध्ये बचत खाते असे म्हणतात. हे खाते सर्व साधारण लोकांसाठी असते. बचत खाते हे व्यक्तींसाठी असते. आपल्या केलेल्या कामातून बचत करण्यासाठी, पगारदार व्यक्तींसाठी आपला पगार खात्यावर जमा करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी तसेच गॅसची सबसिडी जमा करण्यासाठी, इतर शासकीय निधी मिळण्यासाठी आणि इतर कामासाठी बचत खात्यासाठी आवश्यकता असते.

बचत खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती

  • ओळखीचा पुरावा

  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • पासपोर्ट

  • चालक परवाना

  • मतदार ओळखपत्र

  • मनरेगा जॉब कार्ड

  • पत्ता पुरावा

  • पासपोर्ट

  • युटिलिटी बिल - 2 महिन्यांपेक्षा कमी जुने

  • ग्राहकाच्या निवासस्थानाच्या पत्त्याची पडताळणी करणारे मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाचे पत्र

  • बँक पासबुक किंवा बँक खाते विवरण

Saving Account Benefits
Money Saving Tips : महागाई वाढतच चालली! कमी पगारात बचत कशी कराल? वाचा भन्नाट टिप्स

SBI

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) बचत व्याजदरानुसार बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात १० कोटी रुपयांपर्यंत शिल्लक ठेवल्यास २.७० टक्के व्याज देते. तर 10 कोटींपेक्षा जास्त रकमेवर बँक 2 टक्के व्याज दर देते.

HDFC Bank

देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीच्या बचत व्याजदरानुसार बचत खात्यातील शिल्लक ५० लाखरुपयांपेक्षा कमी असल्यास बँक आपल्या ग्राहकांना ३ टक्के व्याज दर देते. तर 50 लाखरुपयांपेक्षा जास्त रकमेवर बँक 3.50 टक्के व्याज दर देते.

Saving Account Benefits
Battery Saving Tips: प्रवास करताना तुमच्याही Mobile ची बॅटरी लवकर उतरतेय, मग या ट्रीक्सने वाढवा battery backup

ICICI Bank

देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या बचत व्याजदरानुसार बचत खात्यात दिवसअखेर ीस ५० लाखरुपयांपेक्षा कमी शिल्लक ठेवल्यास बँक आपल्या ग्राहकांना ३ टक्के व्याज दर देते. दिवसअखेर ५० लाखरुपयांपेक्षा जास्त रकमेवर बँक ३.५० टक्के दराने व्याज देते.

PNB

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) बचत व्याजदरानुसार बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक ठेवल्यास 2.70 टक्के व्याज दर देते. १० लाख ते १०० कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवर बँक २.७५ टक्के, तर १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या ठेवींवर बँक ३ टक्के व्याज देते.

Saving Account Benefits
Money Saving Tips : एकाने कमवायचं अन् एकाने घालवायचं असं कसं चालेल? दोघांनीही बचत केली पाहिजे!

Canara Bank

कॅनरा बँकेच्या बचत व्याजदरानुसार बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यातील विविध रकमेसाठी २.९० टक्के ते ४ टक्के व्याज दर देते. तर 2 कोटी रुपयांच्या बॅलन्सवर बँक 90 टक्के व्याज दर देते.

व्याजावरील Tax किती आहे?

इन्कम टॅक्सच्या कलम 80 टीटीएनुसार तुम्हाला 10,000 रुपयांच्या व्याजाच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. यापेक्षा जास्त व्याजाच्या रकमेवर तुम्हाला कर भरावा लागेल. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजातून मिळणाऱ्या ५० हजार रुपयांपर्यंत कोणताही कर आकारला जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com