HCLTech : एचसीएल टेक्नोलॉजीजच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 4% घसरण, आता कंपनी देणार डिव्हिडेंड...

भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नोलॉजीजने (HCL Technologies) नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
HCL Technologies
HCL TechnologiesSakal

भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नोलॉजीजने (HCL Technologies) नुकतेच त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले आहेत. या काळात कंपनीच्या महसुलात वाढ झाली असली तरी कंपनीचा निव्वळ नफा स्थिर राहिला आहे.

गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एचसीएल टेकचा निव्वळ नफा 3,986 कोटीवर स्थिर राहिला. कंपनीचे शेअर्स एका महिन्यात 4 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. आता कंपनीने डिव्हिडेंड जाहीर केला आहे.

26 एप्रिलला एचसीएल टेक्नोलॉजीजचे शेअर्स 27.15 रुपयांनी (1.81%) घसरले आणि एनएसईवर 1477 रुपयांवर क्लोज झाले. यासह, एका महिन्यात स्टॉक सुमारे 4.5% घसरला आहे. एनएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1697.35 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांचा नीचांक 1048 रुपये आहे.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत 8.4 टक्क्यांनी घट झाल्याचे एचसीएलने शुक्रवारी सांगितले. मार्च तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफीट 2022-23 च्या मार्च तिमाहीत 3,983 कोटीच्या तुलनेत 3,986 कोटी होता.

ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4,350 कोटी होता. कंपनीने चालू आर्थिक वर्षात स्थिर चलनात तीन ते पाच टक्के महसूल वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे आणि करपूर्व कमाई (EBIT) मार्जिन 18-19 टक्के आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com