सावधान !! खात्यात दुसऱ्याचे पैसे?

सध्या इंटरनेटच्या जगात सर्व गोष्टी झटपट पूर्ण करण्याची सवय आणि सोय झाली आहे. पैशाचे व्यवहार करणेही अगदी सहज झाले आहेत.
Money Transfer
Money Transfersakal

- शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक

सध्या इंटरनेटच्या जगात सर्व गोष्टी झटपट पूर्ण करण्याची सवय आणि सोय झाली आहे. पैशाचे व्यवहार करणेही अगदी सहज झाले आहे, आता मोबाईलवरून काही सेकंदात पैसे कोणाला पाठविणे, कोणाकडून येणे असे सगळे व्यवहार सहजसुलभ झाले आहेत. मात्र, अशा झटपट व्यवहारांमुळे धोकेही वाढले आहेत, त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

‘मनी म्यूल’चे जाळे

‘मनी म्यूल’ (money mule) या गुन्हे प्रकारात गुन्हेगार चोरीचे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात फिरवत असतात. त्यामुळे अनेकदा काही लोकांना अनपेक्षित एखादी मोठी रक्कम आपल्या खात्यात आल्याचे आढळते. तुमच्यापैकी कोणालाही असा अनुभव कधीतरी आलाही असेल.

असे कोणाच्या खात्यात चुकून पैसे आले, तर गुन्हेगार व्यक्ती ज्याच्या खात्यात असे पैसे आले आहेत, त्यांना फोन करून तुम्ही त्यातले थोडे ठेवून, उरलेले परत पाठवा, असे सांगतात किंवा पैसे परत पाठवल्यावर काही रक्कम कमिशन म्हणून देतो, असे आमिषही दाखवतात. या व्यवहारातून ते तुमचे यूपीआय, जीपे, पेटीएमबाबतची माहिती चोरून तुमच्या खात्यातील पैसे चोरट्यांच्या खात्यात पाठवू शकतात.

लोकांना एक कोटींचा गंडा

मुंबईमध्ये नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली. चोरट्यांनी ८१ लोकांच्या खात्यात काही किरकोळ रक्कम गुगल पेद्वारे पाठवली. नंतर या सर्व लोकांना फोन करून काही रक्कम चुकून तुमच्या खात्यात पाठविली गेल्याचे सांगितले, ती आम्हाला अमुक अमुक नंबरला परत पाठवा, असे सांगितले.

पैसे मिळालेल्या भोळ्याभाबड्या लोकांनी त्या नंबरवर ‘गुगलपे’ने पैसे परत पाठवले आणि त्यानंतर चोरट्यांनी मालवेअर ॲपद्वारे (malware app) या लोकांच्या ‘गुगलपे’ची माहिती चोरून जवळपास एक कोटी रुपयांना गंडा घातला.

घ्यावयाची काळजी...

  • असे पैसे आलेच, तर परत करण्याची घाई करू नका.

  • संबंधित अनोळखी माणसाचा फोन किंवा मेसेज आला, तर त्याला जवळच्या पोलिस चौकीत बोलवा आणि तिथे पैसे देतो, असे सांगा.

  • पोलिस चौकीत जाताना सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी घ्या. शक्य असल्यास माहितगार व्यक्तीलाही बरोबर घेऊन जा.

  • ताबडतोब बँकेत जाऊन तक्रार करा.

  • अशी अचानक एखादी रक्कम जमा झाली, तर https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. ही रक्कम एखाद्या गुन्ह्यातीलही असण्याची शक्यता असू शकते.

  • तुम्ही तक्रार केली नाहीत आणि ती रक्कम गुन्ह्यासंबंधित असेल, तर पोलिस चोरीचा माल म्हणून बँकेस सांगून खाते ब्लॉक करू शकतात. मात्र, तुमची तक्रार आधीच आलेली असेल, तर खाते ब्लॉक होणार नाही.

  • आपल्या खात्यातील छोट्या रकमांचा नेहमी आढावा घ्या.

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते, यूपीआयबाबत माहिती देऊ नका.

  • कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.

असे घडल्यास काय करावे?

  • आपल्या मोबाईलमधील बँकिंग सुविधा, जीपे, पेटीएम तात्पुरते बंद करा.

  • ताबडतोब बँकेत जाऊन खाते तात्पुरते लॉक करा.

  • https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

  • त्वरित १९३० /१५५२६० या नंबरवर संपर्क साधा. ही यंत्रणा तातडीने योग्य ती कार्यवाही करेल.

  • नेट बँकिंग, यूपीआय, जीपे, पेटीएमचे पासवर्ड बदला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com