Silver Rate : चांदीची एका महिन्यात १६ टक्क्यांनी चांदी, तीन महीने सुरू राहणार वाढ, जाणून घ्या कारण..

येत्या तीन महिन्यात सराफ बाजारात चांदीची अशीच ''चांदी'' सुरू राहील, असा अंदाज आहे.
silver rate
silver rateesakal

सोलापूर : सध्या बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो ८९ हजार रुपये असला तरी मे महिन्यात हा दर ९२ हजार रुपये होता. एका महिन्यात त्याच्या किमतीत १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. चांदीच्या दरात वाढ होण्यामागे त्याचा वाढलेला औद्योगिक क्षेत्रातील वापर हे कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

येत्या तीन महिन्यात सराफ बाजारात चांदीची अशीच ''चांदी'' सुरू राहील, असा अंदाज आहे. त्याविषयी येत्या तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट होणार असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. मे महिन्यात चांदीचा दर प्रतिकिलो ९२ हजार रुपयांवर गेला.

हा देशातील चांदीच्या दराचा आजवरचा विक्रम होता. २१ मे या एकाच दिवशी चांदीच्या दराने साडेसहा हजारांची दरवाढ नोंदवली होती. ती सात टक्क्यांहून अधिक वृद्धी होती. मे महिन्याच्या अखेरीस त्यात आणखी वाढ झाली होती.

गेल्या चार दशकांत त्याच्या दरात २५ पटीहून अधिक वाढ झाली आहे. यावरुन त्याच्या दराचा वेग कमी झाल्याचे दिसत नाही. येत्या काळातही सराफ बाजारात चांदी भाव खाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामागे त्याचा वाढलेला औद्योगिक क्षेत्रातील वापर हे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी येथील बाजारात प्रतिकिलो ८९ हजार रुपयांचा दर होता. येत्या दोन-तीन दिवसांत दराबाबत आणखी चित्र स्पष्ट होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

या उद्योगांत होतोय वापर

चांदी मऊ असते. ती कठीण नसल्याने खराब होत नाही. शिवाय ती विजेची सर्वात चांगली सुवाहक आहे. त्यामुळे त्याचा सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, एअर कंडिशनर, ५ जी तंत्रज्ञान, वॉटर फिल्टर यात वापर केला जात आहे.

येत्या काळात या पाच उत्पादनांचा बाजारातील हिस्साही वाढणार आहे. सध्या सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती वाढत असून, सरकारही अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, प्रदूषणमुक्तीसाठी सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. परिणामी मागणी वाढत आहे. तर सोन्याच्या दरातील वाढीमुळे आता मध्यमवर्ग दागिन्यांसाठी पर्याय म्हणूनही त्याकडे पाहत असल्याचाही हा परिणाम आहे.

चीनमधून चांदीची आयात केली जाते. सध्या औद्योगिक क्षेत्रातील वापरामुळे चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एकूणच धातूंचे दर वाढले आहेत. अमेरिकेतील वित्तीय संस्था धातू उद्योगात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे चांदीला मागणी वाढली आहे. आज प्रतिकिलो ८९ हजार रुपये दर आहे. येत्या दोन-तीन दिवसांत चांदीचा दर येत्या काळात कसा राहील, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

- गिरीष देवरमनी, अध्यक्ष, सोलापूर सराफ व्यापारी असोसिएशन, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com