UPI Payment : ‘यूपीआय’ व्यवहारांमध्ये झाली अल्प घसरण; काय आहे कारण?

देशातील यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) व्यवहारांमध्ये मार्च २०२४ च्या तुलनेत एप्रिलमध्ये एक टक्क्याने आणि मूल्याच्या दृष्टीने ०.७ टक्क्यांनी घट झाली आहे.
UPI Payment
UPI Payment sakal

मुंबई : देशातील यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) व्यवहारांमध्ये मार्च २०२४ च्या तुलनेत एप्रिलमध्ये एक टक्क्याने आणि मूल्याच्या दृष्टीने ०.७ टक्क्यांनी घट झाली आहे. एप्रिलमध्ये एकूण १९.६४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, मार्चमध्ये १९.७८ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. मार्चमध्ये १३.४४ अब्ज व्यवहार झाले होते, त्या तुलनेत एप्रिलमध्ये १३.३ अब्ज व्यवहार झाले.

वार्षिक तुलनेत ‘यूपीआय’ व्यवहार प्रमाणाच्या दृष्टीने ५० टक्के आणि मूल्याच्या दृष्टीने ४० टक्क्यांनी वाढले. फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यवहारांचे प्रमाण अनुक्रमे १२.१० अब्ज आणि मूल्य १८.२८ लाख कोटी रुपये होते. ‘‘ ‘यूपीआय’ व्यवहारांचे प्रमाण आणि मूल्य वार्षिक तुलनेत वाढत आहेत. देशभरात डिजिटल सुविधांचा वापर वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते. सामान्यत: वर्षभरात जास्त खंड दिसतात, त्यामुळे एप्रिल २०२४ चे आकडे मार्च २०२४ च्या तुलनेत कमी आहेत,’’ असे ग्रँट थॉर्नटन भारतचे भागीदार विवेक अय्यर म्हणाले.

मार्चच्या तुलनेत तत्काळ पेमेंट सेवा (आयएमपीएस) व्यवहारांमध्ये एप्रिलमध्ये प्रमाणात सात टक्के आणि मूल्यात पाच टक्क्यांनी घट झाली आहे. मूल्याच्या दृष्टीने एकूण ५.९२ लाख कोटी रुपयांचे , व्यवहार झाले. मार्चमध्ये ते ६.३५ लाख कोटी रुपये, तर फेब्रुवारीमध्ये ५.६८ लाख कोटी रुपये होते. व्यवहारांचे एकूण प्रमाण मार्चमधील ५८.१ कोटींवरून एप्रिलमध्ये ५५ कोटींपर्यंत कमी झाले. फेब्रुवारीमध्ये ५३.५ कोटी व्यवहार झाले होते. वार्षिक तुलनेत व्यवहारांच्या प्रमाणात ११ टक्के आणि मूल्यामध्ये १४ टक्के वाढ झाली आहे.

UPI Payment
UPI: यूपीआय आणि सुविधा; प्रश्‍न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे!

एप्रिलमध्ये, फास्टटॅग व्यवहारांमध्ये प्रमाणात तीन टक्के आणि मूल्यात सहा टक्के घट झाली. मार्चमधील ५९३९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, ते एप्रिलमध्ये ५५९२ कोटी रुपयांवर घसरले. फेब्रुवारीमध्ये व्यवहारमूल्य ५५८२ कोटी रुपये होते आणि जानेवारीमध्ये ५५६० कोटी रुपये होते. मार्चमधील ३३.९ कोटी व्यवहारांच्या तुलनेत एप्रिलमध्ये फास्टटॅगचे प्रमाण ३२.८ कोटींवर आले.फेब्रुवारीमध्ये ३२.३ कोटी आणि जानेवारीत ३३.१ कोटी व्यवहार झाले. एप्रिल २०२३च्या तुलनेत फास्टटॅग व्यवहारांच्या प्रमाणात आठ टक्के आणि मूल्यात नऊ टक्के वाढ झाली आहे.

एप्रिलमध्ये, आधार सक्षम पेमेंट सिस्टीममध्ये (एईपीएस) मार्चच्या तुलनेत १३ टक्के आणि मूल्यात १० टक्के घट झाली. एप्रिलमध्ये या व्यवहारांची रक्कम २५,१७२ कोटी रुपये होती, जी मार्चमध्ये २७,९९६ कोटी रुपये होती. एप्रिलमध्ये ९.४ कोटी व्यवहार झाले होते, जे मार्चमध्ये १०.८ कोटी होते. फेब्रुवारीमध्ये मूल्य आणि प्रमाण यांची आकडेवारी अनुक्रमे २२,००७ कोटी रुपये आणि ८.३ कोटी होती. एप्रिल २०२३ च्या तुलनेत एप्रिल २४मध्ये प्रमाणात सात टक्के आणि मूल्यात १५ टक्के घट झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com