‘जेएम फायनान्शिअल’कडून स्मॉल कॅप फंड दाखल; गुंतवणुकीसाठी योजना १० जूनपर्यंत खुली

भारतीय अर्थव्यवस्था जागतिक वाढीचा दीपस्तंभ बनत असताना, प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायावर केंद्रीत स्मॉल कॅप हे देशाच्या विकासगाथेचा फायदा घेण्यासाठी उत्तम स्थितीत आहेत.
small cap fund entry from JM Financial scheme is open for investment till June 10
small cap fund entry from JM Financial scheme is open for investment till June 10Sakal

मुंबई : जेएम फायनान्शिअल म्युच्युअल फंडाने ‘जेएम स्मॉल कॅप फंड’ ही नवी गुंतवणूक योजना (एनएफओ) खुली केली आहे. या योजनेत १० जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल. या फंडाद्वारे प्रामुख्याने स्मॉल कॅप शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा फायदा होणाऱ्या उच्च वाढीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

शेअर निवडीची प्रक्रिया, पोर्टफोलिओची बांधणी तसेच जोखीम व्यवस्थापनासाठी कठोर निकष निश्चित करण्यात आले असून, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, व्यवस्थापन गुणवत्ता आणि त्यांची अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. सतीश रामनाथन आणि असित भांडारकर या फंडाचे व्यवस्थापक आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था जागतिक वाढीचा दीपस्तंभ बनत असताना, प्रामुख्याने देशांतर्गत व्यवसायावर केंद्रीत स्मॉल कॅप हे देशाच्या विकासगाथेचा फायदा घेण्यासाठी उत्तम स्थितीत आहेत.

गेल्या सात वर्षांच्या आणि त्याहून अधिक कालावधीचा गुंतवणुकीचा दृष्टिकोन असल्यास, निफ्टी स्मॉल कॅप २५० निर्देशांकाने इतक्या कालावधीत कधीत नकारात्मक परतावा दिला असल्याचे कोणतेही उदाहरण दिसत नाही. यामुळे उच्च परतावा देण्यात यश मिळेल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ मोहंती यांनी सांगितले.

मुख्य गुंतवणूक अधिकारी सतीश रामनाथन म्हणाले, ‘‘स्मॉल कॅप अल्पावधीत अस्थिर असले तरी गुंतवणुकीचा दृष्टिकोन दीर्घकालीन असल्यास त्यांच्यात संपत्ती निर्माण करण्याची मोठी क्षमता असते आणि कमी अस्थिरतेसह हे घडून येते.

अलिकडच्या वर्षांत स्मॉल कॅप कंपन्यांनी त्यांचे ताळेबंद बळकट करण्यासाठी, आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी आणि शाश्वत वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. कर्जाचा बोजा कमी असल्याने, कंपन्यांकडे वाढीच्या उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता जास्त असते. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्मॉल कॅपचा पर्याय आकर्षक आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com