
Stock Market Closing Today : आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी झालेल्या चढ उतारांनंतर शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई सेन्सेक्स ७६.५४ अंकांची (०.०९%) वाढ करून ८०,७८७.३० वर बंद झाला तर एनएसई निफ्टीने ३२.१५ अंक (०.१३%) उंचावून २४,७७३.१५ चा टप्पा गाठला. गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावनांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहिले असून येणाऱ्या दिवसांत आणखी तेजीची अपेक्षा आहे.