‘एनपीएस’मधील नवी तरतूद

नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात ‘एनपीएस’ म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.
national pension scheme
national pension schemesakal

नॅशनल पेन्शन स्कीम अर्थात ‘एनपीएस’ म्हणजेच राष्ट्रीय पेन्शन योजनेस दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे यातून मिळणारी कर सवलत, अन्य गुंतवणुकींपेक्षा (पीपीएफ, एनएससी, आयुर्विमा) मिळणारा चांगला परतावा आणि सेवानिवृत्तीनंतर आर्थिक तरतुदीची सोय. असे असले, तरी गुंतवणुकीचा दीर्घ कालावधी आणि तरलता (लिक्विडिटी) नसल्याने अडचणीच्यावेळी खातेधारकास याचा उपयोग होत नाही.

हे लक्षात घेऊन २०१५ मध्ये ‘पीएफआरडीए’ने (पेन्शन फंड नियामक) ठरावीक कालावधीनंतर काही रक्कम काढण्याची सवलत दिली. ही सवलत आता आणखी लवचिक करण्यात आली आहे. नियामकाने १२ जानेवारी २०२४ रोजी एक परिपत्रक काढून याची माहिती दिली असून, याची अंमलबजावणी एक फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे.

यासाठी काढता येईल रक्कम...

आता ‘एनपीएस’ खातेधारक त्यांनी दिलेल्या एकूण योगदानाच्या जास्तीत जास्त २५ टक्के रक्कम पुढील कारणांसाठी विहीत नमुन्याचा अर्ज भरून काढू शकतात.

  • खातेधारकाच्या मुलांच्या (कायदेशीर दत्तक मुलांचाही समावेश) उच्च शिक्षणासाठी

  • मुलांच्या विवाहासाठी (कायदेशीर दत्तक मुलांचाही समावेश)

  • स्वतःच्या अथवा पत्नीसह संयुक्त नावावर पहिले घर घेण्यासाठी

  • कर्करोग, हृदयविकार, पक्षाघात, अवयव प्रत्यारोपण, किडनीचे गंभीर आजार व तत्सम गंभीर आजारावरील उपचारासाठी.

  • अपंगत्व व त्यासंबंधीच्या उपचारासाठी

  • खातेदाराच्या स्वतःच्या कौशल्य विकासासाठीच्या खर्चासाठी

  • खातेदार स्वतः एखादे स्टार्ट-अप सुरू करणार असल्यास त्यासाठीच्या खर्चासाठी

अटी

  • खाते उघडल्यापासून तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक

  • जास्तीतजास्त २५ टक्के रकमेत गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा समावेश असणार नाही (फक्त भरलेल्या रकमेच्या २५ टक्के)

  • केवळ तीनदाच अशी रक्कम काढता येईल. प्रत्येक पुढच्यावेळी रक्कम काढताना आधीची रक्कम काढलेल्या तारखेनंतर जमा केलेल्या रकमेच्या २५ टक्के रक्कम काढता येईल.

यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज (सेल्फ डिक्लरेशनसहीत) प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन पद्धतीने खातेदारास स्वतः जमा करावा लागतो. खातेदार गंभीर आजारी असेल, तरच नजीकचा नातेवाईक ही कार्यवाही करू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com