
सूरतमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे - सावजी धानजी ढोलकिया. एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन, पुढे हिरे व्यापारी बनत हजारो कोटींचं साम्राज्य उभे करणारे ढोलकिया हे आपल्या उदार स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहेत.
ढोलकिया हे कित्येक वेळा दिवाळी बोनसमध्ये आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि ज्वेलरी भेट म्हणून देत असतात. मात्र, आपल्या मुलाला आणि नातवाला देखील त्यांनी अगदी 200 रुपये मजूरीवर काम करायला सांगितलं होतं. कदाचित त्यांच्या या साधेपणातच त्यांच्या यशाचं रहस्य लपलं आहे.
सावजी ढोलकिया यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी गुजरातच्या दुधाला गावात झाला होता. एका शेतकरी कुटुंबात ते जन्माला आहे. सावजी यांना आणखी तीन भाऊ आहेत. परिस्थिती नसल्यामुळे सावजी यांना चौथीमध्येच शाळा सोडावी लागली होती.
यानंतर त्यांनी सूरतमध्ये आपल्या काकांसोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या काकांचा हिऱ्याचा व्यापार होता. नंतर त्यांचे भाऊ हिम्मत आणि तुलसी यांनीही त्यांच्यासोबतच काम करण्यास सुरुवात केली.
पुढे 1992 साली सावजी यांनी आपल्या तीन भावांसोबत मिळून हरी कृष्णा एक्सपोर्ट्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीचे डायमंड कटिंग अँड पॉलिशिंग युनिट हे सूरतमध्ये उभारण्यात आलं. तर एक्सपोर्ट ऑफिस हे मुंबईमध्ये उभारण्यात आलं.
2014 सालापर्यंत या कंपनीची वाढ एवढी जोरदार झाली, की हिरे व्यापारातील एक अग्रगण्य नाव म्हणून सावजी यांच्या कंपनीचा उल्लेख होऊ लागला. तोपर्यंत कंपनीमधील कामगारांची संख्या तब्बल 6,500 पेक्षा जास्त झाली होती.
सावजी यांनी 2005 साली 'किसना' नावाने एक ज्वेलरी ब्रँड लाँच केला होता. आज किसना हा भारतातील सगळ्यात मोठा डायमंड ज्वेलरी ब्रँड आहे. देशभरात त्यांचे 6,250 आउटलेट्स आहेत.
सावजी हे आपल्या दानशूर स्वभावासाठी ओळखले जातात. 2016 साली सावजी यांनी कंपनीतील कर्मचाऱ्याना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 गाड्या गिफ्ट केल्या होत्या. पुढे 2018 साली देखील त्यांनी कंपनीतील 600 कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून कार गिफ्ट दिल्या होत्या.
असे बोनस देण्यामागचं कारण विचारलं असता ते म्हणाले होते, की "स्वतःचं घर आणि गाडी असावी हे जवळपास प्रत्येकाचं स्वप्नं असतं. मी केवळ माझ्या कर्मचाऱ्यांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत आहे."
सावजी यांनी आपला मुलगा द्रव्य याला ताकीद दिली होती, की मोठं होण्यासाठी आपलं नाव वापरायचं नाही. त्यांच्या मुलाने मॅकडॉनल्ड्स, कॉल सेंटर आणि अगदी बेकरीमध्येही 200 रुपये मजूरीवर काम केलं. पुढे त्यांनी आपल्या MBA केलेल्या नातवाला देखील अवघे सहा हजार रुपये देऊन चेन्नईला पाठवलं होतं. बिझनेस स्कूलमध्ये शिकलेल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात कशा वापरायच्या याचे धडे मिळावेत यासाठी त्यांनी असं केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.