
नवी दिल्ली: स्वित्झर्लंडने भारताचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन' (MFN) दर्जा काढून घेतला आहे. हा निर्णय भारतीय सुप्रीम कोर्टाच्या नेस्ले प्रकरणातील निर्णयावर आधारित आहे. या निर्णयामुळे भारत आणि स्वित्झर्लंडच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय कंपन्यांच्या स्वित्झर्लंडमधील कामकाजावर आणि स्विस गुंतवणुकीवरही याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.