Employment News : 'या' कंपनीची मोठी घोषणा; स्टार्टअपमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना देणार नोकऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Employment News

Employment News : 'या' कंपनीची मोठी घोषणा; स्टार्टअपमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना देणार नोकऱ्या

Layoff : जगभरात अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (TCS) म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही.

कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, ''TCS मध्ये आम्ही प्रदीर्घ करिअरसाठी कर्मचाऱ्यांना तयार करतो.''

नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांची भरती करणार :

टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''स्टार्टअप कंपन्यांमध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत त्या कर्मचाऱ्यांना कामावर घेणार आहे.''

त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा जगभरातील बड्या माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत.

लक्कर म्हणाले, आमचा कर्मचारी कपातीवर विश्वास नाही. आम्ही कलागुणांना पुढे नेतो. अनेक कंपन्यांनी आपल्या इच्छेपेक्षा जास्त लोकांना काम दिल्याने असे पाऊल उचलावे लागत असल्याचे ते म्हणाले.

जेव्हा एखादा कर्मचारी TCS मध्ये सामील होतो तेव्हा त्यांना 'उत्पादक' बनवण्याची जबाबदारी कंपनीची असते.

लक्कर म्हणाले की, कधीकधी अशी परिस्थिती येते जेव्हा कर्मचार्‍यांकडे उपलब्ध कार्यक्षमता गरजेपेक्षा कमी असते. अशा परिस्थितीत आम्ही कर्मचाऱ्याला वेळ देतो आणि त्याला प्रशिक्षण देतो.

टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या 6 लाखांहून अधिक आहे. यावेळीही कंपनी कर्मचाऱ्यांना मागील वर्षांप्रमाणेच पगारवाढ देणार असल्याचे लक्कर यांनी सांगितले.

ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत अशा भारतीयांनाही कंपनी अमेरिकेत नोकरीची संधी देणार आहे. सध्या अमेरिकेतील TCS मध्ये 70 टक्के अमेरिकेतील कर्मचारी आणि 30 टक्के भारतीय कर्मचारी काम करतात.

भविष्यात 50-50 टक्के करण्याची योजना आहे. याशिवाय कंपनी दरवेळेप्रमाणेच कर्मचाऱ्यांचीही भरती करणार आहे.