TRAI News : ग्राहकांच्या तक्रारी नंतर TRAI चा टेलिकॉम कंपन्यांना दणका; सेवांचा दर्जा सुधारला नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TRAI News

TRAI News : ग्राहकांच्या तक्रारी नंतर TRAI चा टेलिकॉम कंपन्यांना दणका; सेवांचा दर्जा सुधारला नाहीतर...

TRAI News : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणला (TRAI) सतत कॉल ड्रॉप्स आणि गुणवत्तेबाबत ग्राहकांकडून तक्रारी येत आहेत. तक्रारी लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांना कॉल ड्रॉप आणि डेटा आउटेजची प्रकरणे राज्य स्तरावर नोंदवण्यास सांगितले आहे.

यासोबतच या समस्या सोडविण्यासाठी तातडीने कारवाई करावी, जेणेकरून दूरसंचार सेवांबाबत ग्राहकांना समस्या येणार नाहीत.

ट्रायने बैठकीचे दिले आदेश :

ट्रायच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांची सेवा गुणवत्ता, 5G नियम आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीनंतर ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, ''आम्ही कॉल ड्रॉप्स आणि सेवेच्या गुणवत्तेचा प्रश्न पाहत आहोत आणि 5G सेवा आल्यानंतरही तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. आम्ही ऑपरेटर्सना तात्काळ सेवेचा दर्जा सुधारण्यास सांगितले आहे.''

दूरसंचार सेवांचा दर्जा घसरता कामा नये :

ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना सांगितले की, ''5G नेटवर्क आणताना सेवांचा दर्जा बिघडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

त्याच वेळी, टेलिकॉम कंपन्यांनी देखील मान्य केले आहे की, 5G रोलआउटमुळे काही ठिकाणी नेटवर्कमध्ये समस्या आहे, ज्यात आणखी सुधारणा केली जाईल.''

स्पॅम कॉल आणि संदेश कमी करण्याची तयारी :

TRAI ने नोंदणी नसलेल्या टेलीमार्केटर्सना ब्लॉक करण्यासाठी AI आणि ML टूल्स लागू करण्याबाबत चर्चा केली आहे.

यावर ट्रायचे अध्यक्ष पीडी वाघेला म्हणाले की, ''येत्या दोन महिन्यांत एक नवीन सर्वसमावेशक साधन (जे व्होडाफोन आयडियाद्वारे चाचणी केले जात आहे) लागू केले जाऊ शकते. यामुळे स्पॅम कॉल आणि संदेश कमी होतील.''