Zomato : झोमॅटोच्या शेअर्समध्ये जबरदस्त ऍक्शन, 1 वर्षात 225% परतावा...

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ - उतार सुरु आहे अशात बऱ्याच शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. पण एक स्टॉक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि तो म्हणजेच झोमॅटोचा (Zomato).
 Tremendous action in Zomato shares 225 percent return in 1 year
Tremendous action in Zomato shares 225 percent return in 1 yearSakal

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून चढ - उतार सुरु आहे अशात बऱ्याच शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. पण एक स्टॉक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि तो म्हणजेच झोमॅटोचा (Zomato). झोमॅटोच्या शेअर्समध्ये येत्या काळात चांगली वाढ दिसून येऊ शकते, त्यामुळेच शेअरवर बाय रेंटीगसह टारगेट प्राइस वाढवली आहे. झोमॅटोचे शेअर्स सध्या 188 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने झोमॅटोचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी झोमॅटोसाठीचे टारगेट 40 टक्क्यांनी अपग्रेड केले आहे. आता नवीन टारगेट 240 रुपये करण्यात आले आहे जे पूर्वी 170 रुपये होते. सध्याच्या किमतींवर आधारित, नवीन टारगेट सुमारे 28-30% जास्त आहे. 12 एप्रिलला झोमॅटोच्या शेअर्सने 199 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक (All Time High) गाठला होता.

झोमॅटोने 2022 मध्ये क्विक-कॉमर्स ब्लिंकीट 60 कोटी डॉलर्सना विकत घेतले होते. आता त्याचे व्हॅल्यूएशन 13 अब्ज डॉलर्स इतके केले जात आहे. ब्लिंकिटची एंप्लॉयड व्हॅल्यू आता झोमॅटोच्या फूड डिलीव्हरी बिझनेसपेक्षा जास्त झाली आहे. मार्च 2023 मध्ये ब्लिंकिटच्या शेअरचे व्हॅल्यू केवळ 16 रुपये होती, जी एप्रिल 2024 पर्यंत 98 रुपयांवर पोहोचली आहे. मार्च 2023 मध्ये झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बिझसेनची व्हॅल्यू 48 रुपये प्रति शेअर होती. एप्रिल 2024 पर्यंत, त्याची किंमत 119 रुपये आहे.

झोमॅटोचे शेअर्स सध्या 188 रुपयांवर ट्रेड करत आहेत. मागच्या आठवड्यात स्टॉकने 0.4 टक्के नेगिटीव्ह रिटर्न दिला आणि दोन आठवड्यात 2 टक्के नेगिटीव्ह रिटर्न दिला आहे. एका महिन्यात 3.25 टक्के, तीन महिन्यांत 38 टक्के, या वर्षी आतापर्यंत 51 टक्के, सहा महिन्यांत 77 टक्के, एका वर्षात 225 टक्के रिटर्न दिला आहे. या वर्षी 18 जानेवारी रोजी या शेअरने 121 रुपयांचा नीचांक गाठला होता. 12 एप्रिल रोजी 199.7 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com