
नवी दिल्ली : फेब्रुवारीमध्ये देशात एकूण १६.११ अब्ज युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’ व्यवहार झाले असून, त्यांचे मूल्य २१.४८ लाख कोटी रुपये आहे. जानेवारीच्या तुलनेत व्यवहारांच्या संख्येत पाच टक्क्यांनी घट झाली असून, मूल्यही ६.५ टक्क्यांनी घटले आहे.