UPI : ‘यूपीआय’ व्यवहारांचा नवा उच्चांक; मे महिन्यात २०.४५ लाख कोटींचे १४.०४अब्ज व्यवहार

एप्रिलमधील १३.३० अब्ज रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी वाढले आणि एप्रिलमधील १९.६४ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढले.
UPI
UPI Sakal

नवी दिल्ली : देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेसच्या (यूपीआय) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांनी मे महिन्यात नवा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात तब्बल २०.४५ लाख कोटी रुपयांचे १४.०४ अब्ज व्यवहार झाले आहेत.

एप्रिलमधील १३.३० अब्ज रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी वाढले आणि एप्रिलमधील १९.६४ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ४ टक्क्यांनी वाढले. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) आज ही माहिती दिली.

मे २०२३ मधील व्यवहारांच्या तुलनेत मे २०२४ मे व्यवहारांमध्ये ४९ टक्क्यांनी, तर मूल्याच्या बाबतीत ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ मध्ये ‘यूपीआय’ कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत मे महिन्यातील व्यवहार आणि मूल्याने उच्चांक नोंदवला आहे.

इमिजिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) व्यवहारांची संख्या एप्रिलमधील ५५ कोटींच्या तुलनेत मे महिन्यात १.४५ टक्क्यांनी वाढून ५५.८ कोटी झाली असून, मूल्याच्या बाबतीत मे महिन्यात २.३६ टक्क्यांनी वाढ झाली असून, ते ६.०६ लाख कोटी रुपये झाले आहे.

एप्रिलमध्ये आयएमपीएस व्यवहारांचे मूल्य ५.९२ लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत मे २०२४ मध्ये व्यवहारांची संख्या १२ टक्क्यांनी, तर मूल्य १५ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिलमधील ३२.८ कोटी व्यवहारांच्या तुलनेत मे महिन्यात फास्टटॅग व्यवहार सहा टक्क्यांनी वाढून ३४.७ कोटी झाले, तर मे महिन्यात फास्टटॅग व्यवहारांचे मूल्य ५९०८ कोटी रुपये झाले, एप्रिलमध्ये ते ५५९२ कोटी रुपये होते.

मे २०२३ च्या तुलनेत मे २०२४ मध्ये व्यवहारांची संख्या चार टक्क्यांनी वाढली आहे, तर मूल्यात नऊ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यात आधार सक्षम पेमेंट सिस्टीमद्वारे नऊ कोटी व्यवहार झाले असून, एप्रिलमधील ९.५ कोटी व्यवहारांच्या तुलनेत त्यात चार टक्क्यांनी घट झाली आहे. मूल्याच्या बाबतीतही, एप्रिलमधील २५,१७२ कोटी रुपयांच्या तुलनेत सात टक्क्यांनी घसरण होऊन ते २३,४१७ कोटी रुपये झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com