Rohit Jawa : कोण आहेत रोहित जावा ज्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीची सूत्रे हाती घेतलीत

27 जून 2023 पासून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केली जाईल.
Rohit Jawa
Rohit JawaSakal

Rohit Jawa : देशातील सर्वात मोठी एफएमसीजी (FMCG) कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने आपल्या उच्च व्यवस्थापनात बदल करण्याची घोषणा केली आहे.

रोहित जावा यांची हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कंपनीने शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांची या पदावर 27 जून 2023 पासून पाच वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. कंपनीने याबाबतची माहिती शेअर बाजाराला दिली आहे.

रोहित जावा सध्या हिंदुस्तान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असलेले संजीव मेहता यांची जागा घेतील. 10 मार्च रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Rohit Jawa
Income Tax Notice : भाजीवाल्याच्या खात्यात अचानक जमा झाले 172 कोटी रुपये; नोटीस आल्यावर प्रकरण उघडकीस

रोहित 1988 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीशी जोडले गेले :

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, रोहित जावा 1988 मध्ये कंपनीमध्ये सामील झाले. त्यांनी कंपनीमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सुरुवात केली. 56 वर्षाचे रोहित सध्या लंडनमध्ये असतात आणि युनिलिव्हरमध्ये चीफ ट्रान्सफॉर्मेशन पदावर आहेत.

चीनमध्ये उत्तर आशियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी चीनमध्ये युनिलिव्हरचा व्यवसाय वाढविण्यात मोठी भूमिका बजावली आहे. संजीव मेहता यांना ऑक्टोबर 2013 मध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनवण्यात आले होते.

दिल्ली विद्यापीठातून शिक्षण :

रोहित जावा यांनी सेंट स्टीफन कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या एफएमएसमधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमातही भाग घेतला होता.

रोहित जावा यांनी त्यांच्या मार्केटिंग कारकिर्दीत आशियाई क्षेत्रातील उद्योगात चांगले योगदान दिले आहे. इंटरनॅशनलिस्ट मॅगझिनने 2013 मध्ये त्यांना 'द एशिया 50' मार्केटर्सपैकी एक म्हणून ओळखले. त्यांना 2015 चा 'सीईओ एक्सेल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Rohit Jawa
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com