
भारतातील किरकोळ विक्री क्षेत्रात डी-मार्टने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सामान्य माणसासाठी परवडणाऱ्या किमती आणि सवलतींमुळे डी-मार्ट ग्राहकांचा पहिला पर्याय बनला आहे. किराणा, घरगुती वस्तूंपासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होतं. पण खरेदीचा आनंद घेतल्यानंतर बाहेर पडताना सिक्युरिटी कर्मचारी तुमचं बिल आणि पिशव्या का तपासतात? यामागचं कारण जाणून घेणं रोचक आहे.