
नियमितपणे बोनस शेअर देणाऱ्या कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांसाठी दुभत्या गायीसारखा असतो. असा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ ठेवल्यास गुंतवणूकदारांना त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळतात. नियमितपणे नफा कमावणारी कंपनी त्या नफ्याचा काही हिस्सा भागधारकांना लाभांशाच्या रूपात देत असतेच. परंतु, असा लाभांश दिल्यानंतरदेखील जो नफा उरतो तो संचित नफ्याच्या स्वरूपात कंपनीकडे राहतो.