yes bank introduces upi payments on its rupay credit card
yes bank introduces upi payments on its rupay credit cardSakal

UPI Payment : रूपे क्रेडिट कार्डाद्वारे येस बँकेची यूपीआय सुविधा

येस बँकेने रूपे क्रेडिट कार्डाद्वारे यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा आज दाखल केली

मुंबई : येस बँकेने रूपे क्रेडिट कार्डाद्वारे यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा आज दाखल केली. आता ग्राहकांना येस बँक रूपे क्रेडिट कार्ड भीम, फोनपे, पेटीएम, गुगल पे आदी अॅपशी जोडता येणार असून, कार्डावर आधारित सर्व व्यवहार जास्त सोपे व सुरक्षितपणे करता येतील.

ग्राहकांना ‘क्रेडिट मुक्त’काळाचा लाभही घेता येणार आहे. यापूर्वी हा लाभ केवळ पीओएस किंवा ई-कॉमवर आधारित व्यवहारांपुरता मर्यादित होता. येस बँक क्रेडिट कार्ड असलेल्या आणि रूपे क्रेडिट कार्ड नसलेल्या कोणत्याही ग्राहकाला व्हर्च्युअल येस बँक रूपे क्रेडिट कार्ड घेऊन ते यूपीआय अ‍ॅपशी जोडता येईल.

यामुळे क्रेडिट कार्डाच्या फायद्यांसह ग्राहकांना विविध लाभ मिळतील तसेच व्यापाऱ्यांची पेमेंट स्वीकारार्हता वाढेल. ‘आज देशातील एकूण यूपीआय व्यवहारांमध्ये येस बँकेचा सुमारे ४० टक्के वाटा आहे. रूपे क्रेडिट कार्डाद्वारे यूपीआय पेमेंट सेवा हे ग्राहकांना लाभदायक आणि सोयीस्कर बँकिंग सेवा देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे,’ असे येस बँकेचे कार्यकारी संचालक राजन पेंटल म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com