Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. (Crude Oil Prices)
Oil Prices
Oil Prices

नवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यात चढे राहिलेले कच्च्या तेलाचे दर आता स्थिर झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या सात आठवड्यातील सर्वात निच्चांकी पातळीवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ८० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.(Crude Oil Prices)

कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत ७८.९९ डॉलर झाली आहे. काही काळापूर्वी कच्च्या तेलाची किंमत ९१ डॉलरपर्यंत पोहोचली होती. पण, आता यात घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर येत्या काळात सरकार महत्त्वाचा निर्णय घेतं का हे पाहावं लागणार आहे. (oil prices below 80 dollar per barrel)

Oil Prices
Crude oil : कच्च्या तेलाचे आयातमूल्य १६ टक्क्यांनी घटले; तेल मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट

सध्या जागतिक स्थिती स्फोटक आहे. जगातील काही भागात दोन देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु होऊन आता दोन वर्ष होत आहेत. रशिया हा मोठा तेल निर्यात करणारा देश आहे. त्यामुळे या देशातील परिस्थितीचा परिणाम तेलाच्या व्यवहारावर होतो.

दुसरीकडे, ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केला होता. इस्राइलने त्याला प्रत्यु्त्तर दिलं आहे. युद्धात इराणने देखील एन्ट्री केली आहे. इराणकडून इस्राइलवर मिसाईल डागण्यात आले आहेत. तुर्तास या देशांमध्ये तणाव आहे. मध्य आशियातील परिस्थिती तेलाच्या किंमतीवर परिणाम पाडत असते.

Oil Prices
Home-Remedies For Dandruff: महागडे शॅम्पू अन् तेल वापरूनही कोंडा कमी झाला नसेल तर वापरा 'हे' घरगुती उपाय

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घट होण्याचे पडसाद शेअर मार्केटवर देखील पाहायला मिळाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. बीपीसीएलचे शेअर्स ४.४३ टक्क्यांनी वाढून ६३४.८० रुपयांवर गेले आहेत. एचपीसीएलचे शेअर्स ७.६७ टक्क्यांनी वाढून ५३३.२० रुपये किंमतीचे झाले आहेत. आयओसीचे शेअर्स २.६० टक्क्यांनी वाढून १७३.३५ रुपयांवर बंद झाले. एकंदरीत सकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर पडला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com