
Nirmala Sitharaman: केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी धनधान्य योजना जाहीर केली आहे. ही योजना राज्यांच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. सुरुवातीला धनधान्य योजनेमध्ये शंभर जिल्ह्यांचा समावेश असेल. या योजनेचा लाभ १.७ कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.