
दिलीप घाटे
dilipghate2@gmail.com
पंतप्रधान मुद्रा योजनेला (PMMY) यंदा दहा वर्षे पूर्ण झाली. या योजनेचा मुख्य उद्देश निधी नसलेल्या सूक्ष्म उद्योगांना आणि लघु व्यवसायांना निधी देणे हा होता. तारणाचा (Security) भार काढून टाकून आणि प्रवेश सुलभ करून मुद्रा योजनेने तळागाळातील उद्योजकतेच्या एका नव्या युगाचा पाया रचला. या योजनेच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा...
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सूक्ष्म, लघु उद्योगांना संस्थात्मक कर्ज देऊन पंतप्रधान मुद्रा योजनेने भक्कम पाठिंबा दिला आहे. अगदी झाडू उत्पादन असो, की शिवणकाम केंद्रे किंवा चहाच्या दुकानांपासून ते सलून, मोबाईल दुरूस्ती व्यवसायांपर्यंत, कोट्यवधी सूक्ष्म-उद्योजक आत्मविश्वासाने पुढे आले आहेत, ज्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रणालीमुळे समक्ष केले आहे. लोकांच्या आकांक्षावर आणि त्यांच्या बांधणीच्या क्षमतेवर विश्वास हा या योजनेचा मूळ गाभा होता म्हणजे अगदी सर्वांत लहान स्वप्नांनाही वाढीसाठी व्यासपीठ मिळावे या समजुतीवर विश्वास! म्हणून मुद्रा योजना ही विश्वासाची कहाणी आहे.