
आनंद पोफळे
anandpophale@gmail.com
पोर्टफोलिओ म्हणजे आपल्याकडे असलेल्या सर्व अॅसेटचा म्हणजे शेअर, म्युच्युअल फंड, सोने, बाँड, रिअल इस्टेट अशा सर्व मालमत्तांचा संग्रह असतो. बाजारातील चढ-उतारांमुळे आपल्या पोर्टफोलिओवर होणाऱ्या परिणामांना आपण स्वत: जबाबदार आहोत, याची जाणीव करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे. आपला पोर्टफोलिओ बाजारातील चढ-उतार पचविण्यास सक्षम आहे का हे तपासण्यासाठी आणि नसल्यास तो कसा करता येईल, याची दिशा यातून मिळू शकेल.