

Post-Sale Discount Controversy Sparks Consumer Concern
Sakal
-अॅड. विनायक आगाशे, ज्येष्ठ कर सल्लागार
वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत वस्तूच्या विक्रीवर किंवा दिलेल्या सेवेवर हा कर आकारला जातो; पण कोणत्या किमतीवर? त्याचे उत्तर कलम १५ मध्ये दिले आहे. ग्राहकाला जे बिल दिले जाते त्यामध्ये वस्तूची किंमत दर्शवलेली असते. त्या किमतीवर सामान्यतः काही अपवाद वगळता ‘जीएसटी’ आकारला जातो. परंतु, या किमतीत डिस्काउंटचा समावेश असल्यास त्यावर हा कर आकारला जात नाही. याचे ठळक उदाहरण म्हणजे ट्रेड डिस्काउंट. ही रक्कम मालाच्या मूळ किमतीतून वजा केली जाते.