

Importance of Charity and Generosity How Helping Others Creates Positive Change and Strengthens Social Bonds in Communities
esakal
- डॉ. वीरेंद्र ताटके, गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवे कंपनीचे संस्थापक वॉरेन बफेट यांनी पुन्हा एकदा आपल्या दातृत्वाची प्रचिती दिली आहे. अमेरिकेतील ‘थॅंक्सगिव्हिंग’ सणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी चार सेवाभावी संस्थांना सुमारे ५० हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या बर्कशायर हॅथवे कंपनीचे शेअर दान करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी ‘थॅंक्सगिव्हिंग’ म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण साजरा केला जातो. आपल्या संपत्तीचा आनंद केवळ आपणच घेण्यापेक्षा तो वाटून घेण्याने वाढतो, याच भावनेतून त्यांनी ही देणगी दिली आहे.