Premium|Marathi Business : टचस्क्रीनच्या उत्पादनातील मराठी पाऊल

Global Touchscreen Success Story : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (MSME) हा भारतीय उद्योगविश्वाचा कणा मानला जातो. याच क्षेत्रातील ‘कीट्रॉनिक्स’ या कंपनीची यशोगाथा
Pune’s Keetronics proves that ‘Small is Beautiful’ in India’s MSME landscape

Pune’s Keetronics proves that ‘Small is Beautiful’ in India’s MSME landscape

E sakal

Updated on

प्रसाद घारे

prasad.ghare@gmail.com

आपल्या देशात डिसेंबर २०२४च्या आकडेवारीनुसार, पाच कोटी ७० लाख नोंदणीकृत सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत आणि या उद्योगांनी २४.१४ कोटी रोजगार उपलब्ध केले आहेत.

भारतीय उद्योगजगतात ९६ टक्के लहान कंपन्या आहेत. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात ४० टक्के आणि भारतीय निर्यातीत ४२ टक्के वाटा या लहान कंपन्यांचा आहे. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागांतही विविध क्षेत्रांत लहान कंपन्या कार्यरत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला बेरोजगारीचा प्रश्न कायमच सतावत असतो. अशा परिस्थितीत लहान कंपन्याच लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करताना दिसतात.

भारतात सध्या ७५ हजार मान्यताप्राप्त स्टार्ट-अप कंपन्या आहेत. त्यात १२ टक्के माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील, नऊ टक्के आरोग्यसेवा आणि जीवनविज्ञान क्षेत्रातील, सात टक्के शिक्षण, पाच टक्के व्यावसायिक आणि व्यावसायिक सेवा; तसेच पाच टक्के कंपन्या शेती क्षेत्रातील आहेत. उद्योगांचे वर्गीकरण करण्याचा सर्वांत सामान्य मार्ग म्हणजे रोजगार देणाऱ्या लोकांची संख्या. भारतीय अर्थव्यवस्थेत लघूउद्योग हे रोजगार देणारे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे क्षेत्र आहे.

कीट्रॉनिक्स : की टू सक्सेस

आजचे जग आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विलक्षण प्रगतीमुळे निर्माण झालेल्या वेगावर आरूढ झालेले आहे. या वेगाने जवळपास सर्वच क्षेत्रांना आणि आपणा सर्वांनाच ‘वन क्लिक’, ‘ऑन फिंगरटिप’, ‘वन टच’ या शब्दांनी मोहित केले आहे.

ऑनलाइनच्या आजच्या जमान्यात सर्वच गोष्टी आता एका बटणावर/टचवर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, आधुनिक प्रकारचे टचस्क्रीन म्हणजेच की-बोर्डचे उत्पादन करणारी कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. ही एक आघाडीची कंपनी आहे. १९९४ मध्ये राजेश कुलकर्णी यांनी पुण्यात या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. या कंपनीची यशोगाथा सर्वच क्षेत्रांतील ‘एमएसएमई’साठी प्रेरणादायक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com