
प्रसाद घारे, prasad.ghare@gmail.com
पुण्याजवळच्या हिंजवडी आयटी पार्कमधील विविध आयटी कंपन्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात, हे जितके खरे आहे; तितकीच ही गोष्टसुद्धा खरी आहे, की हिंजवडीमधील एक तरुण महाराष्ट्रातील तीन हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन केवळ अस्सल गावरान अंडी आणि गावरान कोंबड्यांच्या व्यवसायातून काही कोटी रुपयांची उलाढाल करतो आणि तेदेखील कोणताही गाजावाजा न करता.
या तरुणाचे नाव आहे सौरभ तापकीर आणि त्याच्या कंपनीचे नाव आहे ‘नेचर्स बेस्ट’. त्याची ही यशोगाथा...