Why Quarterly Results Act as a Market Turning Point
Sakal
Sakal Money
तिमाही निकाल बाजारासाठी ‘टर्निंग पॉइंट’
डिसेंबर तिमाहीचे निकाल शेअर बाजारासाठी निर्णायक ठरत असून नफा, विक्री आणि पुढील अंदाजावर बाजाराची दिशा अवलंबून आहे. नफा वाढ १६ टक्क्यांच्या वर राहिल्यास बाजारात मोठी तेजी पाहायला मिळू शकते.
गौरव बोरा (शेअर बाजार विश्लेषक)
अर्थवेध
आर्थिक वर्षातील ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीच्या काळात दिवाळी, लग्नसराई, वर्षअखेरीची खरेदी याद्वारे मोठी उलाढाल होते, त्यामुळे तिसऱ्या तिमाहीचे निकाल हे बाजारासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरतात. कारण बाजारातील शेअरचे भाव शेवटी कंपन्यांचा नफा, विक्री आणि पुढील अंदाज यावरच टिकतात. तिसऱ्या तिमाहीतील निकालांमधून बाजाराला तीन महत्त्वाचे संकेत मिळतात. विक्री वाढली का? नफा वाढला का? आणि पुढील तिमाहीबद्दल कंपनीचा अंदाज काय आहे? विक्री वाढूनही खर्च वाढला आणि नफा घटला, तर बाजार निराश होतो. त्यामुळे गुंतवणूकदार फक्त विक्री नाही, तर नफा आणि नफ्याचे प्रमाणही तपासतात.

