
Gold Loan Just Got Stricter: Know the 2025 RBI Guidelines Before You Borrow
सुधाकर कुलकर्णी
sbkulkarni.pune@gmail.com
अलीकडे बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्था अर्थात ‘एनबीएफसी’ सोने तारण कर्ज अगदी कमीत कमी कागदपत्रे घेऊन त्वरित देऊ करत आहेत. सप्टेंबर २०२४ पासून आतापर्यंत सोने तारण कर्जात सुमारे ५० टक्के इतकी वाढ झाली आहे. ही टक्केवारी अन्य कोणत्याही कर्जवाढीच्या टक्केवारीपेक्षा जास्त आहे. यातील थकीत कर्जांचे प्रमाणही वाढले आहे. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने ताज्या पतधोरणात काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.