

पुण्यातील व्यावसायिकाचा मुंबई उच्च न्यायालयात मोठा विजय! 'सिम स्वॅपिंग'द्वारे झालेली ३८ लाखांची फसवणूक आता बँकच भरणार; ग्राहकांसाठी 'झिरो लायबिलिटी'चा मोठा आधार
Sakal
अशोक जोशी, निवृत्त बँक अधिकारी
मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच म्हणजेच एप्रिल २०२६ मध्ये सायबर फसवणुकीच्या एका महत्त्वाच्या प्रकरणात (रिट पिटिशन नंबर ११९९०/२०२३, सुबोध कोरडे विरुद्ध भारत सरकार व इतर) एचडीएफसी बँकेला पुण्यातील सुबोध कोरडे या व्यावसायिकाला सिम स्वॅपिंगद्वारे झालेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ३८ लाख रुपयांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकाचा (क्र. RBI २०१७-१८/१५ DBR.No.Leg.BC.७८/०९.०७.००५/२०१७-१८) हवाला देऊन न्यायालयाने बँकेला हे आदेश दिले आहेत. त्यामुळे सायबर फसवणुकीबाबत रिझर्व्ह बँकेने दिलेले निर्देश पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.