
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
प्राप्तिकर कायद्याच्या कलम २०६ एबी आणि कलम २०६ सीसीए नुसार करदात्याकडे पॅन असेल, परंतु गेल्या करनिर्धारण वर्षासाठी त्याची टीडीएस किंवा टीसीएसची झालेली प्राप्तिकराची वजावट रक्कम ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक असतानाही त्याने विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतरही ते दाखल केले नसेल, तर त्याच्या उत्पन्नावर वाढीव दराने उद्गम करकपात (टीडीएस) व करसंकलन (टीसीएस) बंधनकारक करण्यात आले होते.