

डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com
अमेरिकेत २९ मार्च रोजी ‘राष्ट्रीय मॉम आणि पॉप बिझनेस ओनर्स डे’ साजरा करतात. अमेरिकेतील ही ‘मॉम आणि पॉप शॉप्स’ म्हणजे आपल्याकडील कोपऱ्यावरील ‘वाण्यांची दुकाने’. स्थानिक अर्थव्यवस्थेत या दुकानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अमेरिकेत हा दिवस साजरा केला जातो आणि स्थानिक वस्तूंना, व्यापाराला प्रोत्साहन दिले जाते. आपल्याकडेही ही वाण्याची दुकानाची संस्कृती पूर्वापार रुजली आहे. मात्र, अलीकडच्या ई-कॉमर्सच्या झंझावातात हा ‘कोपऱ्यावरचा वाणी’ काहीसा दुर्लक्षित होत आहे. त्याचे महत्त्व ओळखून वेळीच त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.