
Senior Citizen Investment Guide: Ensure Income, Health & Security
सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफ
sbkulkarni.pune@gmail.com
सेवानिवृत्तीचा काळ सुखासमाधानाचा असावा, असे प्रत्येकालाच वाटते; मात्र हे प्रामुख्याने आपल्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. सेवानिवृत्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथून पुढे आपल्याला नियमित मिळणारे उत्पन्न थांबणार असते व त्यापुढील वाटचाल आतापर्यंत संचित केलेल्या पैशांवर करायची असते. याबद्दल माहिती देणारा हा लेख...
सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन हे प्रामुख्याने आपल्याकडे असलेली चल-अचल संपत्ती, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व आपल्याकडे असलेले कौशल्य आणि शरीरस्वास्थ्य यावर अवलंबून असते. सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन करणे का गरजेचे असते, त्याबद्दल जाणून घेऊ या. सेवानिवृत्तीनंतर आपल्याला मिळणारे नियमित उत्पन्न थांबणार असले, तरी आपल्या गरजा थांबणार नसतात. त्या आपण हयात असेपर्यंत चालूच राहणार असतात. तसेच, त्यासाठी होणाऱ्या खर्चात महागाईनुसार वाढ होणार असते.