
ॲड. रोहित एरंडे - कायद्याचे अभ्यासक
आधार कार्ड नाही म्हणून बँक खाते उघडण्यास नकार मिळालेल्या ८४ वर्षीय महिला आणि तिची अविवाहित मुलगी संचालक असलेल्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात जानेवारी २०१८ मध्ये याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांच्या मते, केवळ आधार कार्ड नाही म्हणून बँकेत खाते काढता येत नव्हते आणि त्यामुळे मुंबईत असलेल्या स्थावर मिळकती भाड्याने देता येत नव्हत्या. पर्यायाने उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेले भाडे स्वीकारता येत नव्हते.